अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास उडविले घात की अपघात मुक्ताईनगरात उलट – सुलट चर्चा, दोन्ही शक्यतेने चौकशी सुरू !
मुक्ताईनगर प्रतिनिधी, अक्षय काठोके| अज्ञात वाहनाने मुक्ताईनगर येथील दुचाकीस्वार तरुणाला उडविल्याने यात त्यांचा मृत्यु झाला हा घात की अपघात अश्या मुक्ताईनगरात उलट -सुलट चर्चाना उधाण आले आहे. दोन्ही शक्यतेने चौकशी सुरू असल्याची मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी माहिती दिली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे कि, हरताला फाट्याच्या पुढे असलेल्या यादव धाब्यासमोर भरदाव वेगात येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने दुचाकी स्वार तरुण ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता आहे अशाच चर्चा मुक्ताईनगर येथे रंगल्या आहेत.
निलेश सुपडू डवले वय 28 असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रकरणी मयताचा भाऊ मुकेश डवले याच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अज्ञात वाहनवरील चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे करीत आहे
याबाबत “मंडे टू मंडे न्यूजने” मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता घटनेच्या दोन्ही शक्यतांनी तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.