भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू हायस्कूल दहावीचा निकाल 95.38 टक्के

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू हायस्कूलने 2025 च्या दहावीच्या (एस.एस.सी.) परीक्षेत 95.38% यशस्वी निकाल प्राप्त करून पुन्हा एकदा आपली शैक्षणिक उत्कृष्टता सिद्ध केली आहे. या यशाबद्दल शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि व्यवस्थापनाचे अभिनंदन करण्यात आले आहे.

प्रथम पाच यशस्वी विद्यार्थी: रिझवान खान वसीम खान कुरैशी – 84.00% (प्रथम) मिस्बाह परवीन शेख अरशद – 83.60% (द्वितीय) सुफियान शाह आबिद शाह – 83.20% (तृतीय) सिफाना परवीन शेख अनीस – 81.80% (चतुर्थ) अरबिना मोहम्मद इरफान – 81.60% (पंचम)

या सर्व तेजस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.

याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष अकबर खान अमानउल्ला खान, उपाध्यक्ष शेख इक्बाल शेख कादर, सचिव अब्दुल अजीज अब्दुल रशीद सह सचिव अकरम खान अमानउल्ला खान, खजिनदार शेख रफिक शेख गुलाब व सर्व संचालक मंडळ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून तुमच्या या यशाने आम्हाला अभिमान वाटतो. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. असे म्हणत पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

या यशाबद्दल शाळा प्रशासनने शिक्षक आणि पालकांचेही विशेष आभार मानले सावदा येथील ही शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!