मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या “चारो उंगलिया घी मे” लाडक्या बहिणीला आणखी एक मोठं गिफ्ट
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्य सरकार लाडक्या बहिणीचे सर्व लाड पुरवताना दिसत आहे. राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.बत्या सोबत राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहिणीला आणखी एक गिफ्ट जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यात आजघडीला ३ कोटी ४९ लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहेत. मात्र, दोन्ही योजनांचे निकष पाहता यापैकी 2 कोटी कुटुंबाना संबंधित योजनेचा लाभ मिळू शकतो,
५२ लाख १६ हजार केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार असून यात आता मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचा ही समावेश करण्यात आला आहे या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.
३०० रुपयांचे अनुदान केंद्र सरकार उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत सध्या पात्र महिला लाभार्थ्यांना देते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखी ५३० रुपये जमा करेल. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या बँक खात्यात प्रतिसिलिंडर ८३० रुपये जमा करणार आहे. त्या मुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचा स्वयंपाकाचा प्रश्न मिटला असून दर महा १५०० रुपयांसोबत तीन गॅस सिलिंडरचं गिफ्ट मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला दिले जाणार आहे.