भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? काँग्रेसचे काही आमदार- खासदार आमच्या संपर्कात, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील अपयाशा नंतर महा युतीने विधानसभेत मोठं यश मिळविलं, अशातच आता भाजप महाविकास आघाडीला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. भाजपकडून महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जाणार असल्याची शक्यता आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे मोठा धक्कादायक खुलासा केला.

विधानसभेतील पराभवानंतर मविआतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या संदर्भात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे खासदार आम्हाला भेटत असतात असं म्हटलं आहे.
काँग्रेसमध्ये राहुल गांधी आमचे पुढील भविष्य चांगले नाही, असे काँग्रेसच्या खासदारांना वाटत आहे. तसेच आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नसल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “त्यांना त्यांची माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे. काँग्रेसचे नेतृत्व निवडून आलेल्या खासदारां- आमदारांकडे दुर्लक्ष करत आहेत. काँग्रेसला त्यांची माणसे सांभाळता येत नाहीत, त्यामुळे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे असंही म्हणाले की, “खोटारडेपणातून त्यांना काही मतं मिळाली आहेत. आता त्यांच्याच निवडून आलेल्या खासदारांना वाटतं की काँग्रेसमध्ये राहून आमचं भविष्य चांगले नाही. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आणि प्रतिनिधी आम्हाला भेटत असतात. भेटल्यावर त्यांचे दुःख ते मांडत असतात. काँग्रेसचे नेतृत्वाकडून निवडून आलेल्या आमदार खासदारांवर दुर्लक्ष होत आहे. काही लोक अस्वस्थ आहेत,”

आम्ही कधी ईडी, सीबीआयकडे गेलेलो नाही. ईडी, सीबीआयचे त्यांचे नेहमीचे रडगाणं आहे. तपास यंत्रंणा त्यांचे काम करत असतात. पण निवडून आलेले प्रतिनिधी सांभाळता येत नाही हे महाविकास आघाडीचे अपयश आहे. त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत. ते आम्हाला भेटून सांगतात की आम्हाला कुणी विचारत नाही, आमचा पक्ष जनप्रितिनिधी म्हणून प्रोत्साहन देत नाही. विकासकामे करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे समर्थन करत नाही. त्यामुळेच ते अस्वस्थ आहेत,” असंही शेवटी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!