भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

सरकारी जागेवर अतिक्रमण भोवले, मुक्ताईनगर तालुक्यातील आणखी एक महिला ग्रामपंचायत सदस्य अपात्र

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l ग्रामपंचायतीच्या सरकारी जागेवर ग्रामपंचायत सदस्य असताना अतिक्रमण केल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत महिला सदस्य ललिता संजय कोळी याना जिल्हाधिकारी आयुष प्रासद यांनी अपात्र घोषित केले आहे. या आधीही अतिक्रमण व कर न भरल्याने नायगाव ग्रामपंचायतीचे दोन सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले आहे. या  बाबत तक्रार करण्यात आली होती.

अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीचे सदस्य गोपाळ कृष्णा न्हावी यांनी सरकारी जागेवर विनापरवानगी बेकायदेशीर अतिक्रमण करून पक्के राहते घराचे बांधकाम केल्याने सोमवार दिनांक ३० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गोपाळ कृष्णा न्हावी ग्रामपंचायत सदस्य नायगाव, रा. नायगाव, ता. मुक्ताईनगर याना अपात्र घोषित केले होते.

तर दुसरे नायगाव ग्रामपंचायत सदस्य भगवान चुडामण भिल यांनी गेल्या २०२२ – २३ ते २४ ची घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कराची थकबाकी ग्रामपंचायतीत कर भरला नसल्याने याना सुद्धा दिनांक ३० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषित केले होते.

आता ९ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य ललिता संजय कोळी, रा. नायगाव, तालुका मुक्ताईनगर. याना अपात्र घोषित केले आहे.

नायगाव ग्रामपंचायतचे आता पर्यंत ललिता संजय कोळी, गोपाळ कृष्णा न्हावी, व भगवान चुडामण भिल, तिघे रा. नायगाव ग्रामपंचायत सदस्य, ता. मुक्ताईनगर याना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषित केले आहे.एकाच ग्रामपंचायतीचे तीन सदस्य अपात्र घोषित केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!