भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

आणखी एक महिला सरपंच अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी केले घोषित

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सरपंच निवड करीत असताना जात वैधता प्रमाणपत्र तपासणी केली नव्हती, या विषयी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. च्या सरपंच उषा अर्जुन पवार यांच्या सरपंच पदाच्या निवडीविषयी आक्षेप घेणारी तक्रार जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचे कडे ग्रामपंचायत सदस्य नितीन बुंधे यांनी केली होती. त्या याचिकेवर ३० डिसेंबर सोमवार रोजी निकाली काढली. यात शिरसोली प्र. बो. च्या सरपंच उषा अर्जुन पवार यांनी जात वैधता प्रमाणपत्र हे बनावट आणल्याप्रकरणी त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे.

उषा अर्जुन पवार या सरपंच म्हणून ५ मार्च २०२४ रोजी ईश्वरचिट्ठीने निवडून आल्या होत्या. मात्र सरपंच निवड करीत असताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार नियमांचा भंग करण्यात आला. त्या बद्दल अभ्यासी अधिकारी, सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी यावेळी जात वैधता प्रमाणपत्राची अधिकाऱ्यांनी तपासणी केली नाही. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही सरपंच निवड झाली असा आक्षेप नितीन बुंधे यांनी घेतला होता. तसेच खोटे कागदपत्र सादर केल्याप्रकरणी सरपंच उषा पवार यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील तक्रार अर्जात होती.

जिल्ह्याधिकरी यान सर्व बाजू ऐकून घेऊन याबाबत सोमवार दी. ३० डिसेंबर रोजी या तक्रारीवर निकाल देत, सरपंच निवडणूक घेताना कुठल्याही नियमांचा भंग झालेला नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र जात वैधता प्रमाणपत्र हे कुठल्याही सरकारी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले नसल्यामुळे ते अवैध ठरवण्यात येत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. आणि याच कारणामुळे सरपंच उषा अर्जुन पवार यांना सरपंच पदावर अपात्र घोषित करण्यात येत असल्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!