क्राईमजामनेर

जळगाव जिल्ह्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जामनेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यात नुकताच २८ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.त्या नंतर  जिल्ह्यातून आणखी एक घटना समोर आली आहे . जामनेर तालुक्यातील एका गावामध्ये शौचास गेलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला केळीच्या बागेत नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

जामनेर तालुक्यातील एका गावात मोलमजुरी करून परिवारासह रहात असलेल्या १५ वर्षीय मुलगी शौचालयास गेली असताना गावातच राहणारा संशयित आरोपी अजय सुनील भिल. वय वर्ष अंदाजे २० याने तिला जबरदस्ती केळीच्या बागेत ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. सदर मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यावर मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशन ला अजय सुनील भिल यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!