भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग : राज्याच्या राजकारणात आणखी एका नव्या पक्षाची घोषणा, विधानसभेच्या २५ जागा लढविणार

पुणे, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात अनेक पक्ष असताना त्यात भर आणखी एका नव्या पक्षाची भर पडली
असून गेली अनेक वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करणारे बडे नेते रविकांत तुपकर यांच्यावर पक्षाने नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षांतर्गत मतभेदांमुळे ही कारवाई करण्यात आली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली. तर आज त्यांनी पुण्यात बैठक घेत नवीन संघटनेची स्थापन करण्याचा निर्धार केला आहे. तर विधानसभा निवडणुकीत आपण उतरणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले असून येत्या विधानसभेच्या २५ जागा लढविणार असल्याचे त्यानी सांगितले.

रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्या नंतर रविकांत तुपकर यांनी नव्या संघटनेची घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांनी पुण्यात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत २५ जागांवर निवडणूक लढवण्याचे ठरले. या बैठकीनंतर रविकांत तुपकर यांनी आपला पक्ष हा येत्या निवडणुकीत २५ जागांवर निवडणूक लढवणार, अशी घोषणा केली.

दरम्यान, रविकांत तुपकर यांनी आपल्या पक्षाच्या नावाची देखील घोषणा केली असून पक्षाचे नाव महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी असे ठेवले आहे. या २५ जागांमध्ये रविकांत तुपकर यांनी संघटना बुलढाणा जिल्ह्यात विधानसभेच्या ६ जागा लढवणार असल्याचे सांगत विशेष म्हणजे लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. राज्यातील तिसरी आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार असे रविकांत तुपकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!