भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

Breaking : मुक्ताईनगरात पुन्हा लुटमार, सट्टा व्यवसायिकाकडून ८० हजार लुटले, मुक्ताईनगरकर भयभीत ?

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज अक्षय काठोके| गेल्या काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसत आहे. पोलिस प्रशासनाचा कुठलाही धाक राहिलेला नसल्याची दिसत आहे. गोळीबार व चाकूहल्ला करून नुकत्याच मुक्ताईनगर मध्ये झालेल्या लूट नंतर पुन्हा सट्टा व्यावसायिका कडून ८० हजार रुपये लुटल्याची घडल्याची खात्री लायक माहिती मिळत आहे.

या बाबत अधिकृत असे की, मागील आठवड्यात प्रवर्तन चौकातील व्यापारी मंगेश खेवलकर यांच्यावर गोळीबार व चाकू हल्ला करून पैसे लुटल्याची घटना ताजी असताना रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सट्टा व्यवसायिकाकडून ८० हजार रुपये लुटल्याची खात्री लायक माहिती असून तशी खमंग चर्चा सुरू आहे.

सट्टा व्यवसायिक मुक्ताईनगर येथील एका पिढी मालकाकडून ८० हजार रुपये घेऊन जात असताना खामखेडा पुलावर एका अज्ञात दुचाकी चालकाने त्याची दुचाकी सट्टा व्यवसायिकाच्या दुचाकी समोर आडवी लावून काही कळण्याच्या आतच खिशातील ८० हजार रुपये रोख लांबविले सदरील सट्टा व्यवसायिक बेशुद्ध झाल्यामुळे शुद्धीवर आल्यावर हॉस्पिटलमध्ये आपल्या खिशातील रक्कम लांबविल्याची कळले. या लूटमारी व अवैध धंद्यामुळे   सामान्य नागरिक दहशतीत असून पोलीस प्रशासनाच्या या घटनांवर आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याचे बोलले जात असून स्थानिक ठिकाणी डीवायएसपी दर्जाचे अधिकारी असतांना अवैध धंदे व लूटमारीच्या घटना घडने भले मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

सतत घडणाऱ्या घटनांमुळे मुक्ताईनगरकर भयभीत?
दिवसाढवळ्या लुटमारीच्या घटना घडत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मुक्ताईनगर येथे झालेला आहे? पोलीस प्रशासनाने तत्काळ यावर उपाययोजना करून भयमुक्त मुक्ताईनगर केले पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!