भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

ऐनपूर आरोग्य केंद्रात ‘विशेष अतिसार नियंत्रण’ पंधरवाडा मोहिम

Monday To Monday NewsNetwork।

ऐनपुर, ता रावेर(इकबाल पिंजारी)। जिल्ह्या आरोग्य अधिकारी डॉ जमादार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ शिवराय पाटील यांच्या मर्गदर्शना खाली “विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा” कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपूर्ण रावेर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागामध्ये, आरोग्य कर्मचारी तथा आशा सेविकांच्या मार्फत सर्वेक्षण केले जात आहे.

‘अर्भक मृत्यूदर’ व ‘बाल मृत्यूदर’ चे प्रमाण कमी करण्याच्या मुख्य उद्देशाने ५ वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागिल ‘अतिसार’ हेच प्रमुख कारण असून,१०% बालके या अतिसारमुळे दरवर्षी दगावतात आणि ह्या बालमृत्यूचे प्रमाण हे मुख्यतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त असते.अतिसारामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण शून्य करणे, हे उदिष्ट समोर ठेवून,राज्यभरात दिनांक-१५जुलै ते ३० जुलै २०२१ या कालावधीत,”विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा” राबविण्याचे ठरविले असल्याचे ऐनपूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.डी.महाजन व डॉ.सदिप चवरे यांनी सांगितले.

ऐनपूर येथे ‘अतिसार नियंत्रण पंधरवाडा’ या कार्यक्रमांतर्गत,आरोग्य कर्मचारी तथा आशा सेविका ह्या घरोघरी जाऊन ५ वर्षापर्यंतच्या बालकांचे सर्वेक्षण करून, त्यांना अतिसारमुळे होणारे नुकसान, तसेच वारंवार हात धुणे, स्वच्छतेचे नियम व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी उकळून-गार करून पिणे, इत्यादी विषयी मार्गदर्शन व माहिती नागरिकांना सर्वेक्षणादरम्यान दिल्या जात आहेत,तसेच ORS, झिंक च्या गोळ्या देखील देण्यात येत आहेत.
प्रसंगी.. डॉ व्ही.डी. महाजन व डॉ संदीप चवरे यांच्या मार्गदर्शनखाली आशा सेविका-वर्षा विजय अवसरमल .भारती पाटील .मीना जैतकर .रेखा जैतकर .प्रीती पाटील . प्रीती अडबाल जयश्री चौधरी हे भागात सर्वेक्षण करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!