लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव या कार्यालयाचा कायम स्वरूपी नवीन मोबाईल क्रमांक सुरू
भुसावल,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येते की, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र अंतर्गत ला.प्र.वि. जळगांव घटकामध्ये नागरीकांना भ्रष्टाचारासंबंधी ची तक्रार करणे अजुन सोपे व्हावे या प्रयोजना करीता वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार ला.प्र.वि. जळगांव विभागाचा नवीन व्हॉट्स अॅप मोबाईल क्रमांक :-७५८८६६१०६४/7588661064 असा कायमस्वरूपी सुरू करण्यात आलेला आहे. सदर मोबाईल क्रमांकावर नागरिकांना संपर्क करून त्यांची भ्रष्टाचारा संबंधीची तक्रार नोंदविता येणार आहे. सदर मोबाईल क्रमांक हा ला.प्र.वि. जळगांव घटकाचे पोलीस उप अधिक्षक योगेश ठाकुर यांच्याजवळ राहणार असल्याने नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन स्वतःची तक्रार नोंदविता येणार आहे.
सर्व नागरीकांना याद्वारे आव्हान करण्यात येते की, ला.प्र.वि. जळगांव विभागाद्वारे सुरू करण्यात आलेल्या नविन मोबाईल क्रमांकावर संपर्क करून ज्यांना लोकसेवक किंवा अन्य कोणी व्यक्ती सरकारी काम करून देण्याच्या मोबदल्यात लाच रक्कमेची मागणी करीत असतील त्यांची सदरबाबत मोबाईल क्रमांकावर तक्रार नोंदवावी, सदर मोबाईल क्रमांक व्हॉट्स अॅपवर पण उपलब्ध असुन व्हॉट्स अॅपद्वारे देखिल नागरिकांना तकार नोंदविता येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याचा फायदा घ्यावायोगेश जी. ठाकूर पोलीस उप अधिक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो यांनी कळविले


