भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यात दगडफेक, पोलिसावरही चाकूहल्ला, ६६ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील बामणोद या गावात बुधवार रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जुन्या वादातून दगडफेक आणि हाणामारी होऊन त्यात १४ जण जखमी झाले. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसावरही चाकूहल्ला करण्यात आला असून यात सहा जणांना अटक आणि ५० ते ६० जणांवर दंगलीसह दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जुन्या वादातून यावल तालुक्यातील बामणोद या गावात दगडफेक आणि हाणामारी होत असल्याची माहिती मिळाल्याने पो.हे कॉ. विकास सोनवणे हे घटनास्थळी पोहचले.जमावाने त्यांच्यावरही दगडफेक केली तर एकाने त्यांच्यावर चाकू मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो वार चुकवला असता पायाला जखम झाली. यात १४ जण जखमी झाले असून या प्रकरणी सुपडू दगडू सोनवणे.वय १८ वर्ष. यांच्या फिर्यादीवरून ६६ जणांविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो.हे.कॉ. विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बामणोद गावात परिस्थिती नियंत्रणात आहे. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!