सावदा लाच प्रकरणातील दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : सावदा येथील पोलीस उपनिरीक्षक सहाययक पोलीस निरीक्षक यांना लाच घेताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे DYSP शशिकांत पाटील व त्याच्या पथकाने अटक केली होती, आज त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सावदा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कुटुंबातील व्यक्तींना 376,363 च्या गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी 15,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास दादाराव इंगोले याना जळगाव येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक करून जिल्हापेठ पोलिस स्टेशनला ठेवण्यात आले होते आज कोर्टात हजर करण्यात आले होते.
त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी मागण्यात आली होती, भुसावळ कोर्टाने एक दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली असून उद्या त्यांना कोर्टात पुन्हा हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, सावदा पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी जळगाव एलसीबीचे जालिंदर पळे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी रात्री उशिरा कार्यभार स्वीकारला आहे.