भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

एचपीव्ही लसीकरणा साठी पालकांना आवाहन, जिल्हा आरोग्य विभाग जळगाव कडून जनजागृती

जळगाव, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | महिलांमध्ये आढळणारा गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा गंभीर आजार असला तरी योग्य वेळी ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण केल्यास त्यापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यभर एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, जिल्हा आरोग्य विभाग जळगावच्या वतीने पालकांना आपल्या मुलींचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना ही लस देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही लस भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून आयुष्यभर संरक्षण देण्यास मदत करते. शासनामार्फत ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जागतिक स्तरावर प्रमाणित आहे. तसेच ही लस नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, समाजमाध्यमांवर या लसीबाबत काही चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. नागरिकांनी अशा निराधार अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने लसीकरण करणे आवश्यक असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

गावातील सर्व पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे व या जनहिताच्या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. सदर लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथे उपलब्ध आहे. “आपल्या मुलीचे आरोग्य हीच जळगाव जिल्ह्याची खरी संपत्ती,” असेही यावेळी नमूद करण्यात आले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!