मानवाधिकार परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी विनोद कोळी यांची नियुक्ती
रावेर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे खान्देश विभागीय प्रसिध्दी प्रमुख पुनखेडा ता.रावेर येथील रहिवासी युवा निर्भिड पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद रामचंद्र कोळी उर्फ शिवाभाई यांची ( Human Right council ) मानवाधिकार परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल प्रकाश महाले यांनी नियुक्ती केली आहे त्यांनी विनोद कोळी ( शिवाभाई ) यांना नियुक्ती चे पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जाते आहे