मुक्ताईनगर

प्रशिक्षणार्थी गवंड्यांचे मुक्ताईनगर पंचायत समिती विरोधात आमरण उपोषण आंदोलन

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | सर्वांसाठी घरे-२०२४” हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वत:चे हक्काचे पक्के घर मिळावे असा शासनाचा प्रयत्न आहे.त्यानुसार विविध प्रवर्गातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात.
यातप्रधानमंत्री आवास योजना राबविली जाते त्यातुन पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी अनुदान देण्यात येते

घरकुल बांधकाम करण्यासाठी गवंडी प्रशिक्षण योजनेतुन घरकुलांचे बांधकाम करण्यात येत आहे यामध्ये प्रशिक्षणार्थी गवंड्यास अर्धकुशल गवंडी म्हणुन जिल्हा दर सुचित नमूद दराने मजुरी ही मानधन म्हणुन देण्यात येते मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव 27 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजुर झाले होते या घरकुलाचे बांधकाम गवंडी प्रशिक्षण योजनेतुन करण्यात आले यात 27 प्रशिक्षणार्थी गवंड्याची अर्धकुशल गवंडी म्हणुन निवड करण्यात आली होती त्यांच्या मार्फत घरकुलांचे बांधकाम करण्यात आले

परंतु यातील मुक्ताईनगर पंचायत समिती मार्फत यातील काही प्रशिक्षणार्थी गवंड्यांना मानधन अदा करण्यात आले तर काही प्रशिक्षणार्थी गवंड्यांना अजून मानधन अदा करण्यात आले नाही ज्यांना मानधन मिळाले नाही चांगदेव येथिल काही स्थानिक राजकीय व्यक्तींच्या दबावामुळे हे मानधन मिळाले नसल्याचे या प्रशिक्षणार्थी गवंड्यांचे म्हणणे आहे. तसेच या प्रशिक्षणार्थी गवंड्यांनी याबाबत गट विकास अधिकारी मुक्ताईनगर यांच्याकडे तक्रार केली असता गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणार्थी गवंड्यांची तक्रार ऐकुन न घेता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन तक्रारीची दखल न घेता तक्रारकर्त्याना आरेरावीची भाषा वापरून उद्धटपणाची वागणूक दिली

मुक्ताईनगर पंचायत समितीच्या या कारभारा विरोधात
प्रशिक्षणार्थी गवंड्यांनी मुक्ताईनगर पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यामध्ये अक्षय बाळू चौधरी, दादाराव बोदडे,रामलाल गायकवाड,बाळू जिवराम चौधरी, कल्पना बाई बोदडे,छाया बाई कापडणे, सागर कोचुरे, विजय म्हस्के,प्रकाश म्हस्के, लिलाबाई बोदडे, रत्ना बाई बोदडे, केसरबाई बोदडे यांचा समावेश आहे. मुक्ताईनगर पंचायत समिती मध्ये विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देताना त्यात राजकीय हस्तक्षेप केला जात असल्याची नागरिकांची नेहमीची ओरड आहे वरिष्ठांनी यात लक्ष घालून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे या आंदोलनाला ऍड रोहिणी खडसे,राजू माळी, अतुल पाटील,बापू ससाणे, दत्ता पाटील राहुल पाटील, भालेराव यांचा सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!