यावलशैक्षणिकसामाजिक

पाडळसे येथे आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन

पाडळसे, ता. यावल, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l यावल तालुक्यातील पाडळसे येथे जिल्हा कार्यकारी अधिकारी जळगाव  भदाणे साहेब यांच्या सूचनेनुसार व महिला व बालविकास प्रकल्प यावल अंतर्गत सीडीपीओ अर्चना आटोळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा पाडळसे बीड येथील अंगणवाडी मार्फत जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात लोकसहभागातून संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ. गुणवंत पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य पल्लवी तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात ० ते ३ वर्षे वयोगटातील बालकांच्या सुरुवातीच्या वाढीला चालना देण्यासाठी “सुरुवातीचे क्षण मोलाचे”, “खेळणी नको, खेळ हवा”, “पालकांचा थोडा वेळ हवा” यासारख्या उपक्रमांवर भर देण्यात आला.

या वेळी सरपंच सौ. गुणवंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी तायडे, ग्रामविकास अधिकारी सी. एच. वाघमारे, पोलीस पाटील सुरेश खैरनार, पाडळसे बीडच्या पर्यवेक्षिका जया नाईक, कल्पना तायडे, शोभा पाटील, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील, सीमा जावळे, कांचन फेगडे, जितेंद्र फिरके, गणेश कोळी, मिर्झा सर, आरिफ सर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पालक आणि माता उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सुरेखा चौधरी यांनी केले, तर आभार जया नाईक मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!