भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्यमहाराष्ट्र

तुम्ही खातायं “तो” चिनी लसूण तर नव्हे? आरोग्यास हानिकारक व विक्रीस बंदी असलेला चिनी लसूण बाजारात

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l चीन मध्ये सर्वात जास्त लसूण पिकवला जातो. उच्च पातळीची कीटकनाशके लसूणावर वापरल्याने आणि संभाव्य बुरशीजन्य दूषिततेमुळे चिनी लसूण ला भारतात बंदी घालण्यात आली आहे. हा चिनी लसूण आरोग्यास अपायकारक असल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू नये म्हणून २०१४ पासून भारतात चिनी लसूणावर बंदी घालण्यात आलेली आहे. स्थानिक लसुणाच्या भावाच्या तुलनेत चिनी लसूण स्वस्त आहे.

गुजरातमधील राजकोटमध्ये गोंडल कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्रीस आलेल्या चिनी लसणाच्या ३० पोती सापडल्याने हा प्रकार उघडकीस आला. चिनी लसूण कमी किमतीत विकला जात असल्याने व्यापाऱ्यांना यात मोठा नफा मिळतो. हा लसूण आरोग्यास धोकादायक असतानाही फक्त नफ्या पोटी व्यापारी चिनी लसूण तस्करी द्वारे आणून बाजारात विक्री करतात.


चीनमध्ये लसूनाची नैसर्गिकरित्या लागवड न करता पिकविला जातो. जगातील सर्वात मोठा लसूण उत्पादक देश म्हणून चीन कडे पाहिले जाते. भरपूर रसायने आणि कीटकनाशके वापरुन पिकवला जातो. म्हणून हा लसूण आरोग्यास हानिकारक आहे.

भारतीय लसणाच्या तुलनेत चिनी लसूण आकाराने लहान असतो. भारतीय लसणापेक्षा चिनी लसूण वेगळा दिसतो. आणि ते वास ही वेगळा देतात. चिनी लसूण फिकट पांढरा किंवा फिकट गुलाबी रंग असतो. याउलट, भारतीय लसूण मोठा आणि सामान्यतः पांढरा किंवा मलई रंगाचा असतो. भारतीय लसणाचा वास जास्त तीव्र असतो. तर चिनी लसणाचा वास सौम्य असतो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!