धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या तरुणाला ATS ने केली अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : नाशिकमध्ये धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएस पथकाने धडक कारवाई करत नाशिक रोड परिसरातून या तरुणाला अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या धर्मांतर प्रकरणात या तरुणाचा समावेश असल्याचा ATS ला संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये आज महाराष्ट्र ATS ने नाशिक रोड परिसरात ही कारवाई केली आहे. धर्मांतराचा रॅकेट चालवणार्याला एटीएसने अटक केली आहे. आतिफ उर्फ कुणाल असं या तरुणाचं नाव आहे. नाशिक रोडच्या आनंद नगर भागात हा तरुण कुणाल म्हणून वास्तव्याला होता. आतिफच्या खात्यात परदेशातून वेगवेगळ्या खात्यांमधून तब्बल 20 कोटी रुपये जमा झाले आहे. याची तपासणी केली असता पैसे कुठून आले याचा तपशील आरोपी उपलब्ध नाही. ATS या बाबत अधिक तपास करत आहे. उत्तर प्रदेशच्या धर्मांतर प्रकरणात अतिफचा समावेश असल्याचा संशय ATS ला आहे. या कारवाईमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.