तब्बल ४४५ किलो गोमांस जप्त, मुक्ताईनगर मध्ये पोलिसांची मोठी कारवाई
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी |मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे पिंप्री शिवारात ओमनी वाहनातून विनापरवाना गोमांस याची वाहतूक करणाऱ्या तीन तस्करांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या कडून ४४५ किलो गोमांस जप्त कारण्यात आले असून याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० मार्च रविवार रोजी घडली.
मुक्ताईनगर पोलिसाना मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे पिंपरी शिवारातून अवैधपणे वाहनातून गोमास वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ३० मार्च रविवार रोजी दुपारी साडे अकरा वाजता सापळा रचून कारवाई करत ओमनी वाहन क्रमांक. एमएच १९ वाय ५१०३ या नंबरच्या ओमनीला रस्त्यावर अडवून त्याची तपासणी केली असता या वाहनांमध्ये गोणपाटमध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस भरलेले दिसून आले. त्यांच्या कडून पोलिसांनी ४४५ किलो गोमांस जप्त केले असून या संदर्भात पोलिसांनी आरोपी मोहम्मद फारुख शेख नसीर मन्यार, असीफ इब्राहिम कुरेशी दोन्ही राहणार मुक्ताईनगर आणि मेहमूद कुरेशी रा. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश या तिघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.