चाळीसगावजळगाव

कुटुंबाकडून लग्नाला विरोध होत असल्यानं प्रेमीयुगुलानं घेतली रेल्वेसमोर उडी, पुढे काय घडलं…

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक धक्कादायक बातमी जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे.
कुटुंबाकडून लग्नाला विरोध होत असल्यानं प्रेमीयुगुलानं रेल्वेसमोर उडी घेतली. या घटनेनं खळबळ उडाली आहे. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादाक घटना चाळीसगाव तालुक्यात घडली.

घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील प्लॅटफॉर्म दोनवर ही घटना घडली आहे. शितल रामसिंग चव्हाण ही तरुणी व तरुण सचिन सुगम चव्हाण या दोघांच्या लग्नाला कुटुंबाचा विरोध असल्यानं या दोघांनी टोकाची भूमिका घेतल्याची माहिती समोर येत असून या प्रेमियुगुलाने मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेससमोर उडी मारली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणीच्या मृत्यूप्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती चाळीसगाव लोहमार्ग पोलिसां कडून देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!