सावद्यातील जुगार अड्डे बंद असल्याने परिसरातील जुगार अड्ड्याना सुगीचे दिवस
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गेल्या काही महिन्यांपासून सावदा शहरातील जुगार अड्डे बंद झाले आहेत. त्या मुळे मात्र सावदा परिसरातील जुगार अड्ड्याना सुगीचे दिवस आले आहेत.
रावेर तालुक्यातील सावदा येथील जुगार अड्डे गेल्या काही महिन्या पासून बंद आहेत. जुगार अड्ड्यावर दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत होती. परंतु सावदा शहरातील जुगार अड्डे बंद असल्याने सावदा येथून जवळच असलेल्या खिरोदा या गावी पाल रोड वर सबस्टेशन च्या बाजूला व सावखेडा या गावी नदी मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मोठ्या प्रमाणावर जुगार खेळायला जुगारी जमत असतात. खिरोदा येथील जुगार अड्डा आधी तराई भागात होता, मात्र त्याचे स्थलांतर झाले असून तो आता खिरोदा – पाल रोडवरील सब स्टेशन च्या बाजूला सुरू आहे.
तसेच खिरोदा व खिरोदा येथून जवळच असलेल्या सावखेडा या गावी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सुद्धा मोठी गर्दी होत असते. खिरोदा व सावखेडा येथील जुगार अड्ड्यांवर परिसरासह दुरून दुरून जुगारी जुगार खेळण्यास येत असतात. या दोन्ही जुगार अड्ड्यावर दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. जुगार अड्ड्यावर जुगारी लाखो रुपये हारल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. सदर जुगार अड्डे बंद करण्याची मागणी केली जात आहे.