भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

आसेम तर्फे शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर आदिवासी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सत्कार व सन्मान

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दि.०२/०३/२०२५ रोजी यावल येथील पंतायत समितीच्या सभागृहात आसेमं आदिवासी सेवा मंडळ तर्फे आयोजीत आसेमं तर्फे आदर्श शिक्षकांना पुरस्कार व आदिवासी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा समारंभ आसेमं तर्फे आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी जळगांव जिल्ह्यातील आदिवासी एस टी एससी ओबीसी भटक्या विमुक्त,एन टी व्हीजे एनटी समाजातील सोबतच सर्व जातीय १० उत्कृष्ट शिक्षकांना आद्य क्रांतिकारकारी तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कार शाल श्रीफळ सन्मानपत्र मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

सोबतच एस एस सी एच एससी परिक्षेत विशेष गुण मिळवून प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सत्कार सन्मान करुन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी यावल पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके साहेब हे अध्यक्षस्थानी होते .

कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे माजी जि.प.सदस्य मासुम रहेमान, आसेमं चे संस्थापक अध्यक्ष राजु बि-हाम तडवी. आसेमं चे कर्म.संघाचे प्रदेशाध्यक्ष इरफान तडवी, सचिव अनिल नजीर तडवी, जिल्हाअध्यक्ष मुबारक अलीखा तडवी, युवक जिल्हाअध्यक्ष बी.राज,महिला जिल्हाअध्यक्ष अलिशानबाई तडवी, आसेमं आदिवासी पोलीस पाटील समितीचे जिल्हाअध्यक्ष रईस जाफर तडवी, कर्म.संघाचे हनिफ अप्पा साहेब मुसा गुरुजी, मुबारक गुरुजी, अशरफ अप्पा,मजीत अप्पा, सत्तार सर, राजु तडवी मुक्ताईनगर माजी शिक्षणविस्तार अधिकारी ,वनसिम तडवी ट्रेझरी ऑफिसर, रुबाब अप्पा, रशीद साहेब मंडळ अधिकारी, शिक्षक अध्यक्ष श्रीकांत मोटे सर, न्याजुद्दिन वेंडर, सिराज सर वाघझिरा, ठाकूर शब्बीर मुसा पटेल ठाकुर, अरुण तुरेबाज जळगाव, गफुर जनाब, मनवर बु-हान सर, सलीम सर जळगाव, युसुफ चिनावल, कामील नामदार, संजु जमादार, आरीफ तडवी,विजयसिंग पाटील,प्रदिप सोनवणे, योगेश इंगळे मुनाफ भाई सद्दाम तडवी रोशन तडवी फिरोज तडवी सुलेमान तडवी आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!