चरित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दोरीने गळा आवळून खून, त्यानंतर स्वत: ही गळफास घेवून पतीची आत्महत्या
चाळीसगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l पत्निवर नेहमी चरित्र्याचा संशया घेंत असल्याच्या कारणाने वाद निर्माण होऊन एका तरूणाने पत्नीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून नंतर तिचा दोरीने गळा आवळून खून केला त्यानंतर स्वत:ही गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील तळोदा शिवारात घडली. एकाच वेळी दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील तळोदा येथील शिवाजी शामराव पाटील रा. पिंप्री ता.चाळीसगाव यांच्या तळोदा शिवारातील शेतात गोपाल सत्तरसिंग पावरा उर्फ बारेला वय ३० हा तरूण आपल्या पत्नी लक्ष्मीबाई गोपाल पावरा वय २६ हिच्या सोबत राहात होते. गेल्या अनेक दिवसांपासून गोपाल हा आपलिब पत्नी लक्ष्मीबाई गोपाल पावरा हिच्यावर नेहमी चरित्र्यांचा संशय घेत होता. त्या मुळे घरात नेहमीच वाद निर्माण होऊन भांडणे होत होते.
त्यातच सोमवारी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन्ही गोपाल व लक्ष्मीबाई या दोन्ही पती पत्नी घरी असतांना त्यांच्यात वाद निर्माण होऊन वाद इतका विकोपाला पोहोचला की गोपाल पावरा याने पत्नी लक्ष्मीबाई पावरा हिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून दोरीने तिचा गळा आवळला.आणि त्यात लक्ष्मीबाई पावरा हीचा मृत्यू झाला. पत्नी लक्ष्मीबाई चा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच गोपाल याने भीतीपोटी स्वत: ही दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेने चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनस्थळी धाव घेत पंचनामा करून पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत गोपाल पावरा यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा.पोलीस निरीक्षक प्रविण दातिर हे पुढील तपास करीत आहेत.