अनैतिक संबंधात अडसर ठरणार्या पतीची हत्या : जळगाव जिल्ह्यातील सुपारीखोर त्रिकुटा सह पत्नी व प्रियकरला बेड्या
संभाजीनगर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्कl नेहमीच अनैतिक संबंधात पती अडसर ठरू लागल्याने छत्रपती संभाजीनगर येथील पत्नीने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील प्रियकर व जामनेर तालुक्यातील पहूर, येथील अन्य तीन साथीदाराची मदत घेत पतीची गळा चिरून हत्या केली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, संभाजीनगर येथील
रुपाली गणेश दराखे या विवाहितेचे सुपडू सोनू गायकवाड वय.३५ वर्ष. रा. कुर्हाड, ता.पाचोरा. या तरुणाशी सूत जमले होते मात्र अनैतिक संबंधात पती गणेश दराखे अडसर ठरू लागल्याने पत्नीनेच पतीचा काढा काढण्याचे ठरवले व ही बाब प्रियकर सुपडू गायकवाड जवळ बोलून दाखवली. त्यातच गणेश दराखेने आपले घर २१ लाख रुपयात विक्री केल्यानंतर रक्कम आल्यानंतर पत्नीने प्रियकरासोबत मिळून दोन लाखात पतीला मारण्याची पहूरच्या अमोल चौधरीला सुपारीही दिली. दि. ४ रोजी बांधकाम मिस्तरी असलेला गणेश जगन्नाथ दराखे,रा.छत्रपती संभाजीनगर. हा कामावर निघाल्यानंतर रस्त्यात आरोपींनी त्याला गाठत त्याची गळा चिरून हत्या केली.
संभाजीनगर पोलिसांना हत्ये बाबत संशय आल्यानतंर त्यांनी पत्नी रुपाली दराखेला ताब्यात घेत तिने अनैतिक संबंधाची कबुली देत घडलेल्या घटने बाबत माहिती दिली. त्या नुसार जामनेर तालुक्यातील पहूरच्या अमोल चिंतामण चौधरी वय ३३, अजय दिलीप हिवाळे,वय २५, अनिकेत कडूबा चौथे,वय २४, सर्व राहणार पहूर कसबे, ता.जामनेर जि.जळगाव. यांना यांना अटक केली. या बाबत संभाजीनगरच्या सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संभाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, हवालदार संजय नंद, विजय निकम, विजय भाणुसे, मनोहर गीते, चालक संतोष चौरे आदींनी पहूरचे पो निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील अंमलदार गोपाल गायकवाड, ज्ञानेश्वर ठाकरे, विलास चव्हाण यांच्या मदतीने तिघा आरोपींना अटक केली.