भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

आषाढ मासारंभाला आजपासून सुरुवात ; गुरुपौर्णिमा, प्रदोष व्रत, विनायक चतुर्थी,शुभ दिवस..

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आषाढ मासारंभ : आषाढ मासारंभाला आजपासून सुरुवात झाली आहे. आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे. सूर्य जेव्हा जुलै महिन्याच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा हिंदू पंचांगातील आषाढ सुरू असतो. हिंदू धर्ममान्यतेनुसार, आषाढ महिन्याला फार महत्त्व आहे.

“आषाढ”नाव कसं पडलं?
सर्व हिंदू महिन्यांची नावं नक्षत्रांवर आधारित असतात. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचा चंद्र ज्या नक्षत्रात स्थित असतो त्याच नावाच्या आधारे त्या महिन्याचं नाव ठेवलं जातं. जेव्हा आषाढ महिन्याची पौर्णिमा असते तेव्हा चंद्र पूर्व किंवा उत्तर या दोन नक्षत्रांपैकी एका स्थितीत असतो. ज्योतिषीय मान्यतेनुसार, आषाढ नावामागे देखील हिंदू धर्माचं फार महत्त्व आहे. आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला “आषाढ” असे नाव पडले आहे. या महिन्याला ‘शुचि’ असेही म्हटले जाते.

साधारणपणे दर 19 वर्षांनी अधिक आषाढ येतो. विसाव्या शतकात पहिल्यांदा सन 1912मध्ये अधिक आषाढ आला होता.

आषाढ महिन्याचं धार्मिक दृष्टीकोनातून पाहिल्यास फार महत्त्व आहे. या महिन्यात भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. चातुर्मासच्या सुरुवातीचा हा काळ म्हणजे जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत असतात. या काळात भक्त आणि गुरु विशेष साधना करतात. आणि धार्मिक कार्यात सहभागी होतात. यामुळे भक्ताला आत्मशु्द्धी आणि आध्यात्मिक प्रगती प्राप्त करतात.

आषाढ महिन्यातील महत्त्वाचे दिवस
5 जुलै 2024 – ज्येष्ठ अमावस्या
6 जुलै 2024 – आषाढ मासारंभ
8 जुलै 2024 – मुस्लिम नूतन वर्षारंभ
9 जुलै 2024 – विनायक चतुर्थी (अंगारक योग)
14 जुलै 2024 – दुर्गाष्टमी
17 जुलै 2024 – देवशयनी आषाढी एकादशी, मोहरम
19 जुलै 2024 – प्रदोष व्रत
20 जुलै 2024 – पौर्णिमा प्रारंभ, साईबाबा उत्सव प्रारंभ
21 जुलै 2024 – गुरुपौर्णिमा
22 जुलै 2024 – साईबाबा उत्सव समाप्ती शिर्डी
23 जुलै 2024 – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती
24 जुलै 2024 – संकष्ट चतुर्थी
31 जुलै 2024 – कामिका एकादशी

9 जुलै 2024 – विनायक चतुर्थी
हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. चतुर्थीला श्रीगणेशाचे विधीवत पूजन करता व्रत करण्याची परंपरा आहे.

21 जुलै 2024 – गुरुपौर्णिमा
हिंदू संस्कृतीत गुरूला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे. लोक गुरूला देवासारखे पूजनीय मानतात. गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. गुरु हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ असा आहे की जो आपले अज्ञान दूर करतो आणि आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित करतो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा हा हिंदू धर्मातील वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!