सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच घेतांना मंडल अधिकाऱ्यास एसीबीकडुन अटक !
Monday to Monday NewsNetwork।
नाशिक (प्रतिनिधी): येथील इगतपुरी तालुक्यात खरेदी केलेल्या शेत जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्याला एसीबीच्या पथकाकडुन रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने खरेदी केलेल्या इगतपुरी तालुक्यातील मौजे आंबेवाडी शिवारातील गट नंबर 316 मधील 35.70 आर या क्षेत्राची आदिवासी शेत जमीन, या शेत जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराने आंबेवाडी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी इगतपुरी तालुक्यातील टाकेदचे मंडल अधिकारी राजेंद्र रामनाथ आवारे यांच्याकडुन तक्रादाराकडे ८००० रुपये लाचेची मागणी करण्यात आली, मात्र तडजोडी अंती ५००० रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मंडळ अधिकाऱ्याने लांचेची मागणी केली असल्याची तक्रार केल्यानंतर सापळा रचत दि.२२ रोजी साकुरी फाटा येथील हॉटेल संग्राम येथे ५००० हजार रुपयांची लाच घेताना आवारे यांना रंगेहात पकडले असून अटक करण्यात आली आहे.