सहायक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व पीसीआर न घेण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपये लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
याबाबत तक्ररारदार यांनी यवतमाळ एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्यावर पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भगत करत आहेत.त्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व पीसीआर न घेण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मगणी केली.त्या संदर्भात तक्रारदार यांनी एसीबी कडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी सपोनी प्रकाश भगत यांनी तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पांढरकवडा येथील अण्णाभाऊ साठे चौकात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना प्रकाश बापुराव भगत. सहायक पोलीस उपनिरीक्षक. वय-५७ रा. जगदंब लेआऊट, संकटमोचन रोड, पांढरकवडा जि. यवतमाळ यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर पांढरकवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.