भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक २० हजाराची लाच घेतना ACB च्या जाळ्यात

मंडे टू मंडे वृत्तसकलन।

जळगाव प्रतिनिधी । एका प्रकरणात तक्रार यांच्याकडून २० हजाराची लाच घेतल्या प्रकरणी जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील महिला दक्षता विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला आज दुपारी रंगेहात पकडल्याने पोलीस मुख्यालयात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अधिक असे की, जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या महिला दक्षता समिती कार्यालयात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलींद केदार यांनी एका प्रकरणात तक्रार यांच्याकडून २० हजाराची लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने कारवाई करत २० हजाराची लाच घेतांना अटक केली आहे. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकाऱ्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!