क्राईममहाराष्ट्र

मोठी बातमी : माजी गृहमंत्र्यांच्या गाडीवर हल्ला

नागपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नरखेड येथील सांगता सभा आटपून काटोल येथे तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत होते. यादरम्यान काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज  थंडावल्या आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानासाठी मोठी तयारी केली आहे. याचदरम्यान, दुसरीकडे नागपुरातून मोठी बातमी हाती आली आहे. नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. काटोल येथील तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्यावजवळ काही व्यक्तीने त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीवघेणा हल्ला झाला आहे. यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!