जामनेर येथील शेतकऱ्याचा स्वातंत्र्यदिनी मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, वृत्तसंस्था : स्वातंत्र्यदिनी जळगाव जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत असून शेतकरी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील असल्याचं सांगितलं जातंय. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतलंय. ध्वजारोहण झाल्याच्या काही वेळानंच हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण पार पडलं. याचवेळी मंत्रालयाच्या गेटवर जळगाव जिल्ह्यातील शेतकरी सुनील गुजर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा या शेतकऱ्याने प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित नागरिक, पोलिसांनी वेळीच हस्तत्रेप केल्याने पुढील अनर्थ टळला. शेतीत मोठं नुकसान झालंय… घर गहाण पडलंय.. मोठी आर्थिक चणचण आहे, त्यामुळे शेतकऱ्याने आत्महदनाचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय. संबंधित शेतकऱ्याला मंत्रालय पोलीस आणि मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलंय.