रावेर तालुक्यात ग्रा.पं. सदस्यांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न!
अज्ञाता विरुध्द गुन्हा दाखल..
खिर्डी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. विनायक जहुरे l रावेर तालुक्यातील खिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते गणेश आगरकर देवगिरीकर ग्रामपंचायत सदस्य खिर्डी बुद्रुक यांच्यावर राजकीय वैमानस्यातून फिल्मी स्टाईल ने पाठलाग करत हल्ला करण्याचा प्रयत्न गुंडांनी केला असल्याचा आरोप देवगिरीकर यांनी केला आहे.
सविस्तर वृत्त असे की गणेश देवगिरीकर हे खिर्डी येथून धामोडी येथे जात असताना त्यांच्या मोटरसायकल मागे अनोळखी दोन ते तीन लोकांनी शिवीगाड करत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनी न थांबता पुढे जाण्याचा प्रयत्न केला समोरील अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याजवळील धार धार वस्तू बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केला असता चीच फाटा येथून वेगाने धामोडी गावाकडे निघाल्याने बचावले असल्याची माहिती देवगिरी यांनी दिली सदर घटनेने निंभोरा पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध गणेश देवगिरकर यांच्या फिर्यादी हून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे च्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रिजवान पिंजारी करत आहे.
यासंदर्भात गणेश देवगिरकर यांची प्रतिक्रया विचारली असता, ‘ मला राजकीय वैमनस्यातून जिवे ठार करण्याचा प्रयत्न झाला,या आधी देखील माझा शेतापर्यंत सांट्रो कार मधून चार गुंड मला शोधत आले होते. माझ्या जिवाला धोका आहे,माझ्या गावातूनच त्या गुंडांना माझी माहिती पुरवली जात आहे असे मला कळाले त्या माहिती देणाऱ्याला आणि त्या गुंडांना लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने पकडुन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम करावं अशी माझी विनंती आहे. असे मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधीशी बोलताना गणेश देवगिरकर ग्रा पं सदस्य खिर्डी बू! यांनी सांगितले.