भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

निंभोरा गावाच्या सरपंच निवडीकडे लक्ष : ४ डिसेंबरला निवडणूक

निंभोरा बु:ता: रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील निंभोरा बु : येथील मावळते सरपंच सचिन महाले यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या आत सादर न केल्यामुळे अपात्र ठरल्याने जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाने प्रशासनाने दि.४ डिसेंबरला निंभोरा येथील निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.

दरम्यान सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे.त्या पदावर गावातून एकमेव प्रभाग क्र. १ मधील महिला सभासद निर्मलाबाई तुकाराम कोळी या अनुसूचित जातीच्या असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.
निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून के‌ऱ्हाळा येथील मंडळ अधिकारी ए.एम.खवले हे काम पाहणार आहेत दरम्यान सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र ४ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान भरता येईल तर दुपारी २:०० वाजता सरपंच पदासाठी निवडणूक होईल अशी माहिती निंभोरा ग्रामपंचायतचे ग्राम अधिकारी गणेश पाटील यांनी दिली सध्या प्रभारी सरपंच म्हणून रंजना प्रशांत पाटील या कार्यभार पाहत आहे त्या उपसरपंच असून त्यांनी यापूर्वी प्रभारी सरपंच म्हणून कामकाज पाहिलेले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!