भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

दहावी-बारावीच्या परीक्षा फी मध्ये १२ टक्क्यांनी वाढ, फी वाढीचा विद्यार्थ्यांना झटका

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l सर्वत्र शिक्षणावर मोठा खर्च केला जात आहे. सर्व शिक्षा अभियान सारखे अनेक ऊपक्रम राबविले जात असताना शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा फीमध्ये १२ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या असेही कारण देण्यात आले आहे की, कागद महागल्यामुळे यंदापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांची फी वाढवण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या महिन्यात शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. परीक्षा फी मध्ये वाढ केल्याने दहावी – बारावी च्या विद्यार्थ्यां सह पालकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

राज्यात दरवर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत आहे. तसेच परीक्षेच्या वेळी साहित्य पुरवले जाते. याशिवाय बोर्डाच्या परीक्षांसाठी लागणऱ्या कागदाच्या किमतीतही दरवर्षी वाढ होत आहे. तसेच परीक्षे वेळी साहित्यही पुरविले जाते. आणि याच पार्श्वभूमीवर परीक्षा फीमध्ये ५० रुपये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी ४४० रुपये भरावी लागत होती. मात्र आता त्यांना ४९० रुपये भरावे लागणार आहेत.

त्याच बरोबर महाराष्ट्र बोर्डाने प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क आणि प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी ४२० रुपये फी भरावी लागत होती. मात्र आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ४७० रुपये भरावे लागणार आहेत.

दहावी – बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा …
बारावीच्या परीक्षा – सर्वसाधारण व द्विलक्षी विषय – उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – मंगळवार दि. ११ फेब्रुवारी २०२५ ते मंगळवार दि. १८ मार्च २०२५

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२५

दहावीच्या परीक्षा – शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च २०२५

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – सोमवार दि. ३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार दि. २० फेब्रुवारी २०२५

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!