काकूंचे आले, वहिनींचे आले, शेजारच्या ताईंचे आले, मावशींचेही आले, मग माझे का नाही आले? लाडक्या बहिणींच्या डोक्याला ताप…बँकेत बहिणींचा महासागर
सावदा, ता.रावेर मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली असून या योजने अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होणार आहेत. पैसे जमा व्हायला सुरुवातही झाली असून पात्र महिलांना सुरुवातीच्या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा झाली आहेत. जमा झालेले रक्कम काढण्यासाठी स्टेट बँक शाखेत महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
सर्व कागद पत्र दिली. Kyc ही केली मात्र बऱ्याच महिलांच्या खात्यात आता पर्यंत पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झाली नाही, सर्व करूनही पैसे खात्यात न आल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींच्या डोक्याचा ताप मात्र वाढलायं. काकूंचे आले, वहिनींचे आले, शेजारच्या ताईंचे आले, मावशींचेही आले, मग माझे का आले नाही? असा मोठा गंभीर प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला पडला. याचे उत्तर शोधण्यासाठी बऱ्याच भगिनी बँके त आमच्या खात्यात आपले पैसे “का” आले नाहीत यासाठी बँकात विचारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. बँकेत जाऊन तेथे या प्रश्नाचं उत्तर त्या शोधत आहेत. रोज चकरा मारूनही त्यांना याचे उत्तर मिळत नाहीयं.
तसेच बऱ्याच पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. त्या लाभार्थी बहिणींना मिळणारा लाभ आधार बेस प्रणालीवर असल्याने, आधार लिंक व ई के वाय सी झालेली नसल्याकारणाने पैसे निघू शकत नसल्याने ई केवायसी करण्यासाठी बहिणींची मोठ्या प्रमाणात दमछाक होताना दिसून येत आहे .
सावदा येथे स्टेट बँक या राष्ट्रीयकृत बँकेत असंख्य ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात आपल्या बँक खाते असून नेहमी या शाखेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते . खात्यात जमा झालेल्या पैसे काढण्यासाठी बँकेत महिलांनी तसेच इतर वृद्धांचे आलेले पैसे काढण्यासाठी बँक उघडण्याआधीच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, पैसे आले किंवा नाही याचा मेसेज कोणाला येतो किंवा कोणाला येत नाही तसेच एटीएम मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा पैसे नसल्या कारणाने बऱ्याच एटीएम धारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे .या बँकेतील ग्राहकांची नेहमीच गैरसोय होत असते. ही गैरसोय थांबवण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे बँकेच्या ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा पात्र महिलांना पहिला हप्ता बहिणीच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र आता दुसरा हप्ता केव्हा येईल याची वाट बघितली जात आहे.
स्टेट बँकेत महिला भगिनी के वाय सी करायला गेल्या असता बँकेत मोठी गर्दी उसळली असते. यात जेव्हा नंबर लागेल तेव्हा महिला काउंटर वर गेल्यावर कागद पत्र घेऊन पुढच्या टेबल वर पाठविले जाते. तिथे ती कागद पत्र घेऊन पुढचा नंबर घेतला जातो. झालं का kyc विचारले तर, झालं असं सांगितलं जातं. मात्र बऱ्याच महिला भगिनींना पुन्हा पुन्हा kyc साठी यावे लागते.या बाबत कुठलीही यादी जाहीर केली जात नाही. Kyc झाल्याची कुठलीही पावती,पुरावा अस काहीही दिले जात नाही.