सुप्रिया सुळे भिकार#$”, 50 ‘खोके’वरून अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने नव्या वादाला सुरवात
औरंगाबाद, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांनी “इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ”, असं म्हटलं. यानंतर पुन्हा एकदा सत्तार यांनी “ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत, आमचे खोके त्यांचे डोके तपासावे लागेल. सत्तार यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही शिंदे गटातल्या आमदारांना लक्ष्य करताना ५० खोके एकदम ओकेवरून डिवचलं होतं. सुप्रिया सुळेंच्या टीकेबद्दल शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अश्लाघ्य शब्दात उत्तर दिलंय.
‘सुप्रिया सुळे म्हणताहेत की, ५० खोके तुम्हालाही मिळालेत का? त्यावर तुम्ही (अब्दुल सत्तार) त्यांना म्हणता का तुम्हाला द्यायचेत का? तर त्यावर त्या (सुप्रिया सुळे) म्हणताहेत की, तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही त्यांना ऑफर करताहेत… काय सांगाल?’, असा प्रश्न ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांना विचारला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, ‘इतकी भिकार#$ झाली असेल, सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’, असं उत्तर सत्तारांनी दिलं. सत्तार यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.