कोरोना लसींचा काळाबाजार उघड, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Monday To Monday NewsNetwork।
औरंगाबाद, मंडे टू मंडे वृत्तसेवा : एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा चढ-उतार होत असताना दुसरीकडे कोरोना लसींचा काळाबाजार करत ब्लॅक मार्केट करण्याचा पर्दापश पोलिसांनी केला आहे. औरंगाबाद शहरात हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आरोग्य विभागाचा कर्मचारी जिल्ह्यातील वाळूज परिसरात असलेल्या एका खोलीत कोरोना लस चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून विशेष म्हणजे हा कामगार या चोरलेल्या लसींचा काळाबाजार करत ब्लॅक मार्केटल करत दुसऱ्यांना टोचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
काही दिवसांपूर्वी पोलिसांना ही माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी हा काळाबाजार सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला त्यानंतर या लसींच्या कुप्या आणि एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. हा प्रकार औरंगाबाद पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. गणेश दूरळे असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात, चोरी, शासकीय मालमत्तेचे नुकसान, फसवणूक आदी कलमांखाली आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.