मुख्यमंत्र्यांची भाजपला खुली ऑफर : एकत्रित आले तर भावी सहकारी, मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे खळबळ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
औरंगाबाद, मंडे टू मंडे वृत्तसेवा। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी भाषणादरम्यान सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोलेबाजी केल्यावर मुंख्यमंत्र्यांकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी एकत्र आले तर भावी सहकारी होतील असे भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याकडे रोखून म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानावर भाजप नेत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देऊन चांगलेच खतपाणी घातलं आहे.
मुख्यमंत्र्यांची भाजपला खुली ऑफर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला एकाच व्यासपीठावरुन खुली ऑफर दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, आजी-माजी सहकाऱ्यांना उल्लेख करत मागे भाजप नेते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या दिशेने रोखून बघत एकत्र आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी भाजपला खुली ऑफर दिली असल्याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानारुन आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
पुढे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी साथ देण्याची विनंती केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दाखवली आहे. नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी मी तुमच्यासोबत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रुळ असतात, रुळ सोडून इंजिन कुठे जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठे जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता अशी खुली ऑफरच मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याकडे रोखून विधान केल्यामुळे खुली ऑफर दिली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.