भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

२२ मिनटांच्या आदित्य ठाकरेंच्या भाषणात ३१ वेळा ‘गद्दार’चा उल्लेख

औरंगाबाद,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांना ते एकनिष्ठेचे धडे देत आहे. दरम्यान आपल्या प्रत्येक भाषणात आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांचा उल्लेख ‘गद्दार’ म्हणून करत आहेत. औरंगाबादच्या बिडकीन येथील आपल्या २२ मिनटाच्या भाषणातून आदित्य यांनी ३१ वेळा गद्दार म्हणून उल्लेख केला. तर ६ वेळा खंजीर शब्दाचा उल्लेख केला.

आज आदित्य ठाकरे यांनी बंडखोर माजी मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढली . त्यांनतर बिडकीन येथे आदित्य ठाकरे यांची सभा झाली. यावेळी बोलतांना आदित्य यांनी वेळोवेळी बंडखोर आमदारांचा गद्दार म्हणून उल्लेख केला. आदित्य यांचे एकूण २२ मिनटाचे यावेळी भाषण झाले. ज्यात त्यांनी ३१ वेळ गद्दार या शब्दाचा उल्लेख केला. तर शिवसेनेला सोडून गेलेले बंडखोर नाहीत, त्यांनी कोणताही उठाव सुद्धा केला नाही. त्यामुळे हे फक्त गद्दार असून, गद्दारांची ओळख गद्दारच असते असेही आदित्य ठाकरे आपल्या भाषणातून म्हणाले

खंजीरचाही उल्लेख…
आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून गद्दार बरोबरच खंजीर या शब्दाचा सुद्धा अनेकदा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांनी या गद्दार आमदारांना उमेदवारी दिली, मंत्रीपद दिले तरीही या लोकांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे आदित्य म्हणाले. त्यांनी आपल्या २२ मिनटाच्या भाषणात गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसला या शब्दाचा ६ वेळा उल्लेख केला.

संदीपान भूमरेंवर टीका…
यावेळी आपल्या भाषणातून आदित्य ठाकरे यांनी संदिपान भुमरे यांचा सुद्धा समाचार घेतला. मी स्वतः आणि उद्धव ठाकरे यांनी भुमरे यांना भरभरून निधी दिला. मात्र त्यांनतर सुद्धा त्यांनी गद्दारी केली. पाचवेळा उमेदवारी दिली,कॅबिनेट मंत्रिपद दिले. तरीही आमचं काही चुकले का? ज्यामुळे भुमरे यांनी गद्दारी केली असे आदित्य ठाकरे म्हणाले. तर बंडखोरी केल्यानंतर हे लोकं मतदारसंघात दिसले का? असा टोलाही आदित्य यांनी यावेळी लगावला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!