अश्लील चित्रफीत प्रकरणी अखेर महाराज्यांसह महिलेवर गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
औरंगाबाद,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या चार दिवसांपासून बाळकृष्ण माेगल महाराज्यांच्या सोबत ४० वर्षीय समव्यवसाईक महिलेसोबतच्या वादग्रस्त नको त्या अवस्थेतील अश्लील चित्रफिती गंगापूर, वैजापूर तालुक्यात व्हायरल झाली होती संबंधित चित्रफीत काही क्षणातच सर्वत्र व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
एका हॉटेलमध्ये विवाहबाह्य संबंधातून हा प्रकार घडला असल्याचे पुढे येत असून संबंधित चित्रफितीत बाळकृष्ण मोगल आणि समव्यावसायिक महिला नको त्या अवस्थेत दिसून येत होती.समव्यावसायिक क्षेत्रातील महिलेसोबतची अश्लील चित्रफीत व्हायरल झाल्याने अखेर वैजापूरच्या बाळकृष्ण मोगल,वय 48, रा. लासूरगाव, ता. वैजापूर याच्यासह त्या समव्यावसायिक महिलेवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिलेगाव पोलीस स्टेशनला ज्ञानेश्वर माणिकराव खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.