भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

धक्कादायक :नातवाने मुलगी पळवल्याने आजीला विवस्त्र करून मारहाण,व्हिडीओ ही केला व्हायरल

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नातवाने मुलगी पळवली म्हणून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील ओझर गावात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली. गंगापूर फाट्यावर ही पीडित पारधी समाजाची महिला राहते. तिच्या नातवाने आरोपीच्या मुलीला १ तारखेला पळवून नेलं होतं. म्हणून त्याला शोधण्यासाठी ही व्यक्ती गंगापूर फाट्यावर आली होती. त्याच्यासोबत आणखी दोन जण होते. पीडित महिलेच्या घरी पोहोचले आणि तिच्याकडे विचापूस केली. त्यानंतर या तिघांनी पीडित महिलेला बेदम मारहाण केली. हे तिघे एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी या पीडित महिलेला नग्न करून मारहाण केली. पीडित वृद्ध महिलेला काहीच माहित नसल्यामुळे तिने गयावया केली, पण या तिघांनी तिच्यावर कोणतीही दया दाखवली नाही. बेदम मारहाणीमध्ये ही महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर वस्तीवरील लोकांनी आरडाओरडा करत घराकडे धाव घेतली. त्यानंतर या तिघांनी तिथून पळ काढला.

या घटनेला दोन दिवस उलटले तरी कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. पीडितेवर घरीच उपचार करण्यात आले होते. त्यानंतर पीडितेनं गंगापूर पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी विवेक उर्फ चवल्या पिंपळे यांच्यासह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. धक्कादायक म्हणजे, या आरोपींनी पीडित महिलेला विवस्त्र करून मारहाण करत असताना व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!