भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रशैक्षणिक

TET Scam : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील शिक्षकांच्या वेतना बाबत हायकोर्टान दिले ‘हे’ निर्देश

औरंगाबाद,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळा प्रकरणी राज्य शासनानं एक महत्वाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या घोटाळ्यातील शिक्षकांचे वेतन थांबवण्याचं सरकारनं ठरवलं होतं, तसेच याची यादी देखील प्रसिद्ध केली होती. पण याविरोधात काही शिक्षकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

या अनेक याचिकांवर आज खंडपीठात एकत्रित सुनावणी झाली. यावेळी खंडपीठानं म्हटलं की, शिक्षकांचं वेतनं थांबवणं हा त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय करणं आहे. त्याचबरोबर येत्या काळात दिवाळीचा सणवार असणार आहे. तसेच या घोटाळ्याबाबत शासनाकडून अद्याप स्पष्टता दिसत नाही, असं सांगत “या शिक्षकांची वेतनवाढ रोखू शकता पण वेतन थांबवू नका” असं कोर्टानं म्हटलं आहे. यानंतर आता शासकीय वकिलांनी युक्तीवादासाठी पुढची वेळ मागितली आहे. त्यामुळं शिक्षकांना हा अंतरिम दिलासा आहे.

हा दिलासा औरंगाबाद खंडपीठात ज्या दोनशे याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकाकर्त्या शिक्षकांनाच हा दिलासा देण्यात आला आहे. पण त्यांना यामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!