अल्पवयीन सावत्र भाचीवर मामाचा बलात्कार
औरंगाबाद,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र मामाने तीन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.ही घटना २५ एप्रिल रोजी घडली.
पीडित मुलगी अत्याचारानंतर खूप घाबरलेली असताना तिचे रडणे बघून तिला आजीने विचारपूस केली असता मुलीने सर्व हकीकत सांगितली असता हा धक्कादायक प्रकार उघळकीस आला ,आजीने थेट औरंगाबाद मधील उस्मानपुरा पोलीस स्टेशन गाठत या विषयी माहिती दिली. उस्मानपुरामध्ये एका व्यक्तीला ४ बायका, २ पत्नीचा मृत्यू झाला तिसरी पत्नी सोडून गेल्यावर या इसमान चौथं लग्न केले आहे. पहिल्या पत्नीपासून या इसमाला २ मुले आहेत, तर दुसऱ्या पत्नीपासून २ मुली आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चौथ्या पत्नीचा भाऊ घरी आला, त्यांने आपल्याच १३ वर्षांच्या चिमुरड्या भाचीवर त्याने जबरदस्तीने ३ वेळा बलात्कार केला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी पूर्णपणे बिथरली होती. सध्या या पीडित मुलीवर बलात्कार करणारा तिचा सावत्र मामा फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.