भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज ठाकरेंच्या सभेआधीच औरंगाबादेत जमावबंदी लागू, सभा होणार का ?

औरंगाबाद, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांची १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेपूर्वीच औरंगाबाद पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार की नाही व मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबाद आयोजित करण्यात आली आहे. मात्र औरंगाबाद पोलिसांच्या नव्या आदेशानंतर ही सभा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनीदेखील सभेला अद्याप परवानगी दिलेली नव्हती. त्यातच आता येत्या ९ मे पर्यंत आता औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशा स्थितीत राज ठाकरे यांच्या विराट सभेला किमान एक लाख लोक येतील, असा दावा मनसेतर्फे करण्यात येत आहे.

राज ठाकरे यांच्या सभेची औरंगाबादमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. औरंगाबाद शहराच्या हद्दीत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता मनसेसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या ठिकाणी होईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रसिद्ध कऱण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला टीझर शेअऱ केला आहे. मनसेने टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला असून चलो संभाजीनगर अशी घोषणा दिली आहे. या टीझरमध्ये सगळं लक्ष हिंदुत्व आणि भगव्यावरच दिसत आहे. ज्यामध्ये राज ठाकरे आपण धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचं सांगत आहेत. आता सभेला परवानगी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!