भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

श्रीराम अक्षदा मंगल कलश यात्रेने मोडले सावद्यातील सर्व रेकॉर्ड !

सावदा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | अयोध्या येथे दिनांक 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामललाल्ला च्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून अक्षदा घेऊन दाखल झालेल्या मंगल कलशाची सावद्यातील आजची शोभायात्रा आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणारी ठरली.

दुर्गा माता मंदिर येथून शुभारंभ झालेली मंगल कलश शोभायात्रा भगवान महावीर चौक, इंदिरा गांधी चौक, संभाजी चौक, गांधी चौक, गवत बाजार, मोठा आड मार्गे जैन मंदिर येथून प्रस्थान करून दुर्गा माता मंदिराजवळ विसर्जित झाली. या शोभायात्रेमध्ये सकल हिंदू समाजातील जवळपास 28 समाजाचे प्रतिनिधी सपत्नीक हजर झाल्याने सामाजिक समरसतेचे अनोखे दर्शन घडले. सर्वप्रथम वाल्मिकी समाजाचे संदीप करोशिया व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच बौद्ध समाजाचे राहुल बडगे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते मंगल कलशाचे पूजन करून शोभा यात्रेला सुरुवात झाली.

कलश धारण केलेल्या पारंपारिक वेशभूषेतल्या महिला शोभायात्रेच्या अग्रस्थानी होत्या. शोभा यात्रेत होणाऱ्या राम नामाच्या गजरामुळे शहरात मंगलमय वातावरण तयार झाले होते. शहरातील सकल हिंदू बांधवांनी या शोभा यात्रेचे ठिकठिकाणी फुलांची उधळण आणि मंगल कलशाचे पूजन केले. शोभायात्रेच्या मार्गावर दुतर्फा काढलेल्या रांगोळ्या व फुलांनी सजविलेला मार्ग प्रमुख आकर्षण ठरले. या शोभायात्रेमुळे सकल हिंदू समाज एकत्र आला असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. शोभायात्रेत खासदार रक्षा खडसे यांनी भेट देऊन मंगल कलशाचे पूजन करून शोभायात्रेत आपला सहभाग नोंदविला.

१ ते १५ जानेवारी पर्यंत प्रत्येक हिंदूंच्या घरी अक्षदा घेऊन निमंत्रण देण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी नियोजन केले आहे. सुमारे पाचशे वर्षांच्या वनवासानंतर, हजारो कार्य सेवकांचा जीव गेल्यानंतर, शरयू चे पवित्र पाणी कार्य सेवकांच्या रक्ताने लाल झाल्यानंतर आजच्या पिढीला हा सुवर्णक्षण याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य मिळत आहे असे प्रतिपादन एडवोकेट कालिदास ठाकूर यांनी आपल्या समारोपाच्या मनोगतात व्यक्त केले.

२२ जानेवारीला सर्व सावदेवासीयांनी आपल्या जवळच्या मंदिरात मोठ्या पडद्यावर अयोध्येतील सोहळा पाहण्याची व्यवस्था करून दिवसभर राम नामाचा जप करावा तसेच आयुष्यातील सर्वात मोठी दिवाळी या दिवशी मंगलमय वातावरणात साजरी करावी असे आवाहनही त्यांनी पुढे केले. शोभा यात्रेची सांगता महाआरती व समरसता मंत्र पठणाने झाली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!