बाबा सिद्दीकी याची गोळी घालून हत्या, तीन गोळ्या मारल्या, ते ” तीन” शूटर कोण?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. देवीची विसर्जन मिरवणूक जात असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांच्या मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ माजली. तीन जणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर पालिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून एक जण फरार आहे. अलीकडेच त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांचा फोटो देखील समोर आला आहे
हत्येचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक आरोपी हरियाणा येथील असून दुसरा आरोपी उत्तर प्रदेश चा राहणारा आहे. तिघांमधील एक आरोपी अद्यापही फरार आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी अन्य राज्यातील शूटरला सुपारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तिघे आरोपी २७ वर्ष वयाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
बाबा सिध्दीकी यांचे पुत्र झिशान हे आमदार असून बाबा यांनी अलीकडेच अजित पवार गटात प्रवेश घेतला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी जिवे ठार मारण्याची धमकी आली होती. यानंतर हल्लेखोरांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात केलेल्या आरोपींचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या प्राथमिक चौकशीतून माहिती समोर आली आहे.