भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमप्रशासनरावेरसामाजिक

केळी पिक विमा : ७७ शेतकरी अपात्र, ५६ शेतकरी बोगस तर २१ ठिकाणी केळी पिकच अस्तित्वात नसल्याचं तपासणीत उघड

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क| रावेर तालुक्यात हवामानावर आधारित फळपीक विमा अंतर्गत केळी लागवडीच्या तपासणीचे काम वेगाने सुरू आहे. तपासणीत मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता पर्यंत झालेल्या तपासणीत तब्बल ७७ शेतकरी अपात्र ठरले असून, त्यापैकी ५६ शेतकरी बोगस आढळले तर २१ ठिकाणी केळी पिकच अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे.

शुक्रवार दि. २१ मार्च पर्यंत झालेल्या तपासणीत रावेर तालुक्यातील तब्बल ७७ शेतकरी अपात्र ठरले असून, त्यापैकी ५६ शेतकरी बोगस आढळले तर २१ ठिकाणी केळी पिकच अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे. भूमिहीन असताना बोगस कागदपत्रे तयार करून,पाच एकर शेतीची मर्यादा असताना जास्तीच्या शेतीवर इतरांच्या नावे विमा, केळी पिक नसताना केळी पिक दाखवून पिक विम्याचे पैसे हडप केले.

सन २०२४-२५ या वर्षात २५,७९२ शेतकऱ्यांनी २५,४८७.३३ हेक्टर क्षेत्रासाठी फळपीक विमा संरक्षण घेतले आहे. मात्र, प्रत्यक्ष लागवड व विमा घेतलेल्या क्षेत्रात तफावत जाणवू लागल्याने प्रत्यक्ष बांधावर जाऊन क्षेत्र तपासणी केली जात आहे. आतापर्यंत १९,०९२ शेतकऱ्यांच्या १८,९४३.७७ हेक्टर क्षेत्राची तपासणी झाली असून, त्यातील १९,०१५ शेतकऱ्यांची १८,७३५.६९ हेक्टर क्षेत्रफळ तपासणीअंती पात्र ठरले आहे.

तपासणीसाठी उर्वरित शेतकऱ्यांना फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, ग्रामपंचायत स्तरावर याद्या प्रसिद्ध करूनही २५५३ शेतकऱ्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. या शेतकऱ्यांचे एकूण २४७९.९३ हेक्टर क्षेत्र तपासणीसाठी बाकी आहे. अपात्र ठरलेल्या ७७ शेतकऱ्यांमध्ये २१ शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी विमा घेतला तेथे प्रत्यक्ष पिकच आढळले नाही. त्यांचे एकूण क्षेत्र २२.१७ हेक्टर इतके आहे. तर, ५६ शेतकरी बोगस आढळले, म्हणजेच नियमानुसार नोंदणी न करता विमा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, २०३ शेतकऱ्यांनी १०३ हेक्टरपेक्षा जास्त अतिरिक्त विमा घेतल्याचे २१ मार्च पर्यंत उघड झाले आहे.

विमा कंपनी आणि भुसावळ विभागातील कृषी सहाय्यकांच्या विशेष टीमकडून तपासणीचे काम सुरू आहे. शासनाने नोंदवलेल्या नियमानुसार अपात्र व बोगस ठरणाऱ्या शेतकऱ्यांवर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी बी. सी. वाळके यांनी स्पष्ट केले आहे. ३१ मार्च हा जिओ टॅगिंगची अंतिम दिवस आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप तपासणी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा अन्यथा विमा रक्कम मिळण्यास अडचण येऊ शकते. अद्याप ४१४७ शेतकऱ्यांची तपासणी प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

बोगस पिक विम्याचे रॅकेट
रावेर तालुक्यात भूमिहीन असताना दुसऱ्यांच्या शेतावर बोगस कागदपत्रे तयार करून पीक विमा काढणे, केळी पिक नसताना केळी पिक दाखवून बोगस पिक विमा काढणे, भूमिहीन लोकांच्या नावावर पीक वीमे काढण्यात आले आहेत. पाच एकर ची मर्यादा असताना पाच एकराच्या वर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी नातेवाईक, दिवाणजी याच्या नावावर पीक विमा काढलेले आहेत. अशा वेगवेगळ्या फंड्याद्वारे पिकविम्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून काही संबंधित खात्याच्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लाखो रुपये लाटले आहेत….

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!