भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

केळी पिक विमा घोटाळा : रावेर तालुक्यातील चार जणांवर गुन्हा दाखल, आणखी काही बोगस पिक विमा धारक रडारवर

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात केळी पिक विमा योजनेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघळकीस आला असून रावेर तालुक्यातही बोगस पिक विमा उतरवून सुमारे चार कोटी रुपयांहून ही अधिक रकमेची अफरातफर झाल्याचा आरोप असून या प्रकरणी रावेर तालुक्यातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आणखी काही बोगस पिक विमा धारक पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.या मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता असून  या घटनेने बोगस पिक विमा धारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

शासनाची फळ पिक विमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राबविली जात असताना केळी पिक नसताना केळी पिक दाखविणे, अशा अनेक प्रकारे बनावट कागदपत्रांद्वारे बोगस विमा काढून शासनाला गंडवीण्यात आले असल्याचे उघड झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

या संदर्भात रावेर पोलिस स्टेशनला तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयेश संजय कोळी (रावेर), विजय सोपान पाटील (तामसवाडी), प्रफुल्ह रमेश सराफ (रावेर) आणि हर्षल वाळू पाटील (आटवडा) या
चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा प्रकरणांमध्ये  काही कृषी अधिकारी, तलाठी स्टँप वेंडर, काही कृषी खात्याचे कर्मचारी, विमा एजंट, ऑन लाइन काम करणारी यंत्रणा,मध्यस्थी दलाल यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात आखणी अनेकांची पितळ उघडे पडणार असल्याचे बोलले जाते .

सुज्ञ शेतकऱ्यांची मागणी

सन २०२३ च्याही बोगस फळपीक विमा लाटलेल्या शेतकऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल व्हायला पाहिजे सुज्ञ शेतकऱ्यांची मागणी केली आहे. सन २०२२- २०२३ मध्ये रावेर तालुक्यातील कोचूर परिसरात भुमीहीन शेतमजूर यांच्या नावावर ही लाखो रुपयांचे बोगस विमे काढण्यात आलेले होते. (या संदर्भात सविस्तर पुढच्या बातमीत)

दरम्यान, निंभोरा पोलीस स्टेशन ला आणखी काही  बोगस पिक विमा संबंधित संशयितांविरोधात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!