यावल येथे १ ऑगस्ट रोजी केळी प्रशिक्षण वर्ग
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल येथे रावेर यावल मतदार संघाचे आमदार श्री. अमोलदादा हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतुन केळी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र जळगांव याच्या मार्फत कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती यावल. यांनी केळी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे.
केळी लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्रा. किरण जाधव हे मार्गदर्शन करणार असून एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर प्रा.अंजली मेढे तर एकात्मीक रोग व्यवस्थापन या विषयावर प्रा. विजय राज गुजर हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती यावल. यांनी केले असून शेतकरी व नागरिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


