भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

कोरोनामुळे बळी गेलेल्या दोघांचे मृतदेह तब्बल सव्वा वर्षे शवागारातच कुजताय!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

बंगळुरू,वृत्तसंस्था। कोव्हिडमुळे आपल्या प्रियजनांना गमावल्याच्या सुमारे सव्वा वर्षांनंतर बंगळुरुमधील दोन कुटुंबांना पुन्हा एकदा मानसिक धक्का बसला आहे. रुग्णालयाच्या शवागारात त्यांचे मृतदेह तेव्हापासून कुजत पडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

२ जुलै २०२० रोजी मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांच्या धार्मिक रितीरिवाजानुसार श्राद्धाचे विधी केले. मात्र त्यानंतर १६ महिन्यांनी आपल्या आप्तांवर अंत्यसंस्कारच झाले नसल्याची माहिती दोन्ही कुटुंबांना समजली आणि त्यांना मोठा मानसिक धक्का बसला.

कोरोनामुळे ६७ वर्षीय मुनिराजु यांचा २ जुलै २०२० रोजी मृत्यू झाला. बंगळुरूतील ईएसआय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी देशात कोरोनाची पहिली लाट होती. मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले जात नव्हते. त्यामुळे मुनिराजुच्या कुटुंबियांनी बंगळुरू महापालिकेला अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली. मात्र मुनिराजु यांच्यावर अंत्यसंस्कारच झाले नसल्याची, त्यांचा मृतदेह शवागारात कुजल्याची माहिती समजल्यावर कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!